शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"…मग लावा बांबू’’, राज ठाकरेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:38 IST

Raj Thackeray News: रविवारी  एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मागच्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक चिखलफेकीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. दरम्यान, कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात बांबू चर्चेत आला आहे. रविवारी  एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लावा म्हणावं बांबू, असं विधान राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक आज झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे यांनी ‘’लावा म्हणावं बांबू”, अशी प्रतिक्रिया देत विषय संपवला.राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात विकासापेक्षा जातीपातीवरून  तेढ निर्माण करून हाताला मतं लागताहेत हे नेतेमंडळींना कळलंय. त्यामुळे हे त्याच प्रकारे पुढे जातील. मला वाटतं की, समाजानं ही गोष्ट ओळखण्याची गरज आहे असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केलं. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले की, बांबू हा ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डाय ऑक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेणारा आहे. बांबूचे एवढे बायो प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकणार नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड केली पाहिजे. तसेच काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही असे लोक आहेत की सकाळीच भोंगा वाजतो. एक भोंगा निघालाय तर दुसरा चालू आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत