शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"...तर त्यांना योग्य उत्तर देईन", शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाबद्दलच्या लेखावरून सुनील तटकरेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. शिंदे यांच्या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भूमिका मांडली. 

विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकामध्ये लिहिलेल्या लेखात विलिनीकरणाचा मुद्दा अधोरेखित केला. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण सूत्रे अजित पवारांकडेच देण्याचा निर्णय झाला होता, असे शिंदे म्हणाले. पण, त्याच्या एका विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला. 

१२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे देण्याचा निर्णयही शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता, असा शिंदे यांनी या लेखात म्हटले आहे. 

सुनील तटकरे काय बोलले?

शशिकांत शिंदे यांच्या लेखामुळे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. 

सुनील तटकरे यांनी शिंदेंच्या लेखातील काही उल्लेखावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, "थोडी वाक्य आहेत, 'अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुले अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, याची आपल्याला जाणीव आहे, पंरतू झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागेले होते.' यावर माझा खूप आक्षेप आहे", असे तटकरे म्हणाले. 

'शिंदेंनी लिहिलेले अनाठायी आणि गैर आहे'

"अशा पद्धतीचे वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर लेखी स्वरुपात किंवा तोंडी करू नये, असे मला वाटते. भाजपाबरोबर आपण असले पाहिजे, ही अजित पवारांची भूमिका अनेक वर्षांपासून होती. हे जे काही शशिकांत शिंदेंनी लिहिलेलं आहे, ते अनाठायी आहे. गैर आहे. अशा प्रकारे लिखाण करून दादांच्या निधनानंतर वेगळे काहीतरी साधू पाहत आहेत, त्यांना काय बोलायचं आहे, त्यांचे त्यांना माहिती आहे", असेही तटकरे म्हणाले. 

"राष्ट्रवादी काँग्रेसचे मासिक दर महिन्याला प्रकाशित होते. मी अध्यक्ष असताना पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित व्हायचे. पण, आता ती तारीख योगायोग आहे की, मुद्दामहून १२ तारखेनंतर १३ तारखेला लिहायचं म्हणून... याबद्दल मला काही बोलायचं नाहीये", असेही तटकरे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tatkare furious over Shinde's article on NCP merger claims.

Web Summary : Sunil Tatkare criticizes Shashikant Shinde's article suggesting Ajit Pawar would lead NCP post-merger. Tatkare disputes Shinde's claims about Pawar's motives, deeming them inappropriate and opportunistic. He questions the timing of the article's publication.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShashikant Shindeशशिकांत शिंदेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार