Suresh Dhas : "...तर धनंजय मुंडेही आकाच्या शेजारी जातील"; सुरेश धस यांनी केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:41 IST2025-03-09T10:40:31+5:302025-03-09T10:41:10+5:30

Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले.

Then Dhananjay Munde will also go next to Walmik Karad Suresh Dhas's allegation | Suresh Dhas : "...तर धनंजय मुंडेही आकाच्या शेजारी जातील"; सुरेश धस यांनी केला आरोप

Suresh Dhas : "...तर धनंजय मुंडेही आकाच्या शेजारी जातील"; सुरेश धस यांनी केला आरोप

Suresh Dhas ( Marathi News ) :  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मीक कराड मुख्य आरोप असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. यामुळे आता मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दुसरीकडे आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. 

Gaurav Ahuja: गौरव आहुजाने माफी मागितलेले 'शिंदे साहेब' कोण? बडा राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा, पुणेकरांना प्रश्न...

भाजपा आमदार सुरेश धस यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केला आहे. दुर्देवाने सायबर चौकशीमध्ये मुंडे यांच्याविरोधात एखादा पुरावा सापडला तर मुंडे अडकू शकतात, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. 

आमदार सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे यांचा मला राग येतोय. काय होतास तु काय झालास तु. तुम्ही कोणीकडे होता. राज्याच्या विरोधीपक्षनेते पद तुमच्याकडे होते. शरद पवार, अजित पवार यांनी तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली होती. २०१९ पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होता. २०१९ च्या नंतर तुम्ही कुणीकडच्या कुणीकडे गेलात. डायरेक्ट लेफ्टचे राईटला आणि राईटचे लेफ्टला गेला. हे सगळ कशासाठी?, असा सवालही सुरेश धस यांनी केला. 

यावेळी सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा संदर्भ देत भीती व्यक्त  केली." दुर्दैवाने जर सायबर चौकशीमध्ये त्यांचं काही सापडलं तर ते आकाच्या शेजारी जातील',असंही धस म्हणाले. सुदैवाने अजूनही असं काहीही झालेलं नाही. या प्रकरणात आता सायबर विभाग चौकशी करणार आहे. मला त्यांची किव येत आहे, सायबर क्राइमचे तज्ञ सीडीआर तपासणार आहेत. यात ते सापडले तर आकाच्या शेजारी जातील, असंही धस म्हणाले. 

Web Title: Then Dhananjay Munde will also go next to Walmik Karad Suresh Dhas's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.