शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

ठाकरे गटाची मते फुटली, मग मिलिंद नार्वेकरांना कोणाची मते मिळाली? उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 15:16 IST

पाटील यांनी रायगडमध्ये लोकसभेला तटकरेंना केलेली मदत भोवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे.

स्वत:च्या पक्षाची मते नसली तरी अनेकदा विधान परिषद आमदार राहिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना कालच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला नसता तर निवडणूक बिनविरोध झाली असती, परंतू पाटील यांनी रायगडमध्ये लोकसभेला तटकरेंना केलेली मदत भोवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. 

उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचीही मते फुटल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विधान परिषद निवडणुकीत केवळ काँग्रेसचीच नाहीत तर ठाकरे गटाचीही मते फुटली. मिलिंद नार्वेकरांच्या मागे अदृष्य हात होते, असा दावा सामंत यांनी केला आहे. ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असेही सामंत म्हणाले. 

काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही . शरद पवार गटाच्या आमदारांचा शरद पवार यांच्यावर विश्वास नाही. स्वतःहून 22 ते 23 आमदारांनी महायुतीला मतदान केले. भाजपचा आकडा 105 वरून 118 वर गेला, शिंदे साहेबांचा आकडा पाच मी वाढला. अजित पवारांचा आकडा चारने वाढला आहे. पहिल्याच फेरीत आठ उमेदवार निवडून आले, असा दावा सामंत यांनी केला.  तसेच उद्धव ठाकरे गटाची मते १६ होती त्यांच्यामध्ये पाच मते वाढली. ही अदृश्य ताकद कोण आहे ज्यांनी नार्वेकर यांना सोळा वरून 22 वरती नेले, असेही सामंत म्हणाले. 

ठाकरे गटाची मते फुटली तर मग नार्वेकरांना कोणाची मते मिळाली? नार्वेकरांच्या मागे कोणाचे हात होते याबाबत दोन दिवसांत मी माहिती घेईन असेही सामंत म्हणाले. मविआ कशाप्रकारे छोट्या पक्षांना संपविते याचे उत्तम उदाहरण कपिल पाटील आणि जयंत पाटील आहेत अशी टीकाही सामंत यांनी केली. आम्ही आमच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनीही त्यांचे आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते. आमच्यावर आरोप करता मग तुम्ही काय केले, असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला. 

अशी फुटली मते...महाविकास आघाडीकडे ६९ मते होती. यात काँग्रेस - ३७, उद्धव सेना - १५, शरद पवार गट - १२, शेकाप - १, समाजवादी पार्टी २, माकप - १ आणि अपक्ष १ यांचा समावेश होता. मात्र मविआच्या रिंगणात असलेल्या प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (उद्धव सेना) व जयंत पाटील (शेकाप) या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५९ तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने सातव यांना पहिल्या पसंतीची २८ मते देण्याचे निश्चित केले होते. म्हणजे सातव यांना मतदान करण्यास सांगण्यात आलेल्या काँग्रेसच्या २८ आमदारांपैकी ३ आमदारांनी त्यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट आहे. 

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना