शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार; शरद पवारांच्या हस्ते विजेत्याला गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:16 IST

गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगणार आहे.

Maharashtra Kesari 2025 : कर्जत येथील महाराष्ट् केसरीच्या सेमी फायनलमध्ये माती विभागातून वेताळ शेळके, प्रशांत जगताप, तर गादी विभागातून शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली. महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज रविवारी हे चारही मल्ल झुंजणार आहेत. त्यांच्यातूनच विजेता ठरणार आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्र केसरी किताबसाठी सेमी फायनलच्या कुस्त्या रंगल्या. माती विभागात सोलापूरच्या वेताळ शेळके आणि सांगलीच्या सनी मदने यांच्यात सेमी फायनलची प्रथम कुस्ती रंगली. यात सोलापूरच्या वेताळ शेळकेने ११ गुण मिळवत अवघ्या एकाच मिनिटात सनी मदनेवर बाजी मारली. पाटील याला एकही गुण मिळवता आला नाही. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत नांदेडचा अनिल जाधव आणि अकोल्याचा प्रशांत जगताप यांच्यात रोमांचक लढत पाहावयास मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी प्रशांत जगताप याने आक्रमक खेळ करीत १२ गुण प्राप्त करत अनिल जाधववर विजय मिळवत अंतिम लढतीत स्थान मिळविले. अनिल जाधव यास ५ गुण मिळवण्यात यश आले. गादी विभागात नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरचा संग्राम पाटील यांच्यात सेमी फायनलची कुस्ती रंगली. यात शिवराज राक्षेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत ११ गुण मिळवत बाजी मारली. संग्राम पाटीललाही उपांत्य कुस्तीत एकही गुण मिळविता आला नाही. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये मुंबईच्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध सोलापूरच्या शुभम माने यांच्यात झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली. पाटील याने सुरुवातीपासूनच माने याच्यावर पकड घेत ११ गुण प्राप्त करीत विजय मिळविला. शुभम मानेलाही एकही गुण मिळविता आला नाही.

सेमी फायनल कुस्ती मैदानासाठी शनिवारी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांची उपस्थिती होती. त्यांनी माती विभागातील वेताळ शेळके आणि सनी मदने यांची कुस्ती लावली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, कर्जत-जामखेडचे राजकीय पदाधिकारी यांच्यासह आजी-माजी मल्ल उपस्थित होते. या चारही कुस्तीत प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत प्रोत्साहन दिले.

अंतिम सामन्याला शरद पवार राहणार उपस्थितरविवारी महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागात सोलापूरचा वेताळ शेळके आणि अकोल्याचा प्रशांत जगताप यांच्यात लढत होईल. तर गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगणार आहे. या दोन्ही विभागांतील विजेते मल्ल फायनलमध्ये ६६ व्या महाराष्ट्र केसरी किताबसाठी अंतिम सामन्यात एकमेकांसमोर भिडतील. अंतिम सामन्यास ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते विजेत्या मल्लास बक्षीस वितरण करण्यात येईल. 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाSharad Pawarशरद पवारKarjatकर्जतRohit Pawarरोहित पवार