शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार;

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:27 IST

पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्वयंपूर्ण असा हा प्रयोग आता प्रेरणादायी ठरत आहे...

परभणी : गॅसटंचाईच्या काळात धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये एक वेगळीच व्यवस्था अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. येथे गॅसशिवाय शेतीतील काडीकचऱ्यावर ‘शिवम चूल’च्या माध्यमातून दररोज तीन हजार विद्यार्थ्यांचा स्वयंपाक केला जातो. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्वयंपूर्ण असा हा प्रयोग आता प्रेरणादायी ठरत आहे. 

येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये आधुनिक पद्धतीचे सेंट्रल किचन उभारण्यात आले आहे. या किचनमध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळेस हजारो विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. विशेष म्हणजे हा संपूर्ण स्वयंपाक गॅस किंवा लाकडाशिवाय केला जातो, शेतकऱ्यांच्या शेतात उरलेला सोयाबीन भुसा, तुरीचा भुसा, सोयाबीनचे काड, कापसाची पराटी तसेच इतर काडीकचरा याचा या चुलीत इंधन म्हणून वापर केला जातो. या चुलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती निर्धूर आहे. 

धुरातून तयार होते गरम पाणीशिवम चुलीमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा उपयोग करून त्यावर वॉटर हिटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळत आहे.

पर्यावरणपूरक स्वयंपूर्णतेचा संदेशया चुलीची संकल्पना प्रा. किरण सोनटक्के आणि त्यांचे बालमित्र संपत गवते यांच्या चर्चेतून पुढे आली. २००९ साली या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली.  चुलीची रचना योग्य होण्यासाठी तब्बल २७ वेळा प्रयोग करून बदल करण्यात आले.सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीनंतर अखेर ‘शिवम चूल’ पूर्णक्षमतेने कार्यान्वित झाली. जागतिक संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘शिवम चूल’ हा प्रयोग पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्णतेचा आदर्श ठरत आहे. 

केवायसीच्या अफवेने ग्राहकांची मोठी तारांबळधरणगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच केवायसीच्या अफवेने ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. शनिवारी येथील इंडियन गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर  बुकिंगसाठी ग्राहकांची रांग लागली होती.

गॅस संपला तर स्वयंपाकाचे काय होणार, या चिंतेमुळे नागरिक सकाळी सात वाजल्यापासूनच रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. दरम्यान, ऑनलाइन बुकिंगमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.

राज्यात गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठाराज्यात घरगुती एलपीजी गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे.राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी ९ हजार मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून ते ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे.छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री 

English
हिंदी सारांश
Web Title : Shivam Chul: A lifeline during gas shortage; eco-friendly cooking.

Web Summary : During gas scarcity, Dharmapuri's Gyan Sadhana uses 'Shivam Chul,' cooking for 3,000 students daily with farm waste. This eco-friendly, self-sufficient stove uses agricultural residue, providing hot water and a solution to gas shortages, offering a sustainable model.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरIranइराणWarयुद्ध