शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

भाजपाला पाडायला निघालेल्यांचा मुलगा ग्रामपंचायतीत पडला, रणजितसिंहांची जयसिंहराव मोहिते पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 5:17 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  भाजपा उमेदवाराला पाडायला निघालेल्यांचा मुलगाच ग्रामपंचायत निवडणुकीत पडला, असा टोला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंगराव मोहिते पाटील यांना लगावला. 

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान देत धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथील लढत ही चुरशीची झाली आहे. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याने येथील राजकीय वातावरणही तापलं आहे. दरम्यान, भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  भाजपा उमेदवाराला पाडायला निघालेल्यांचा मुलगाच ग्रामपंचायत निवडणुकीत पडला, असा टोला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंगराव मोहिते पाटील यांना लगावला. 

माढा लोकसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेला संबोधित करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जयसिंहराव मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, हॅव पाडू, त्यांव पाडू करणाऱ्या मोहिते पाटील यांचंच पोरगं मागच्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत पडलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व चांगलं होतं. मात्र पोरांनी सगळं वाटोळं केलं, अशी टीका रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली. 

शरद पवार यांनी माढ्याचे खासदार बनल्यानंतर माढ्याचं पाणी बारामतीला पळवलं. मात्र मात्र शरद पवार यांनी पळवलेलं पाणि देवेंद्र फडणवीस यांनी माघारी आणलं, असा दावाही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केला. 

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ८५ हजार मतांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळच्या निवडणुकीत भाजपा सोडून शरद पवार गटात दाखल झालेले धैर्यशिल मोहिते पाटील यांचं आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर आहे. तसेच या मतदारसंघातील काही गटतट मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची कसोटी लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरBJPभाजपाdhairyasheel mohite patilधैर्यशील मोहिते पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४