शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:38 IST

पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती.

पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. पोलिस चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने तिला अटक केली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत.

पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार

"पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला 'अखेर' अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, अशी पोस्ट अंबादास दानवे यांनी केली आहे. 

अंबादास दानवे यांनी हे प्रश्न उपस्थित केले

१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? २. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस 'मुदतवाढ-मुदतवाढ' खेळणार आहात? 

३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? ४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? 

ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर!, असा टोलाही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार

तेजवाणी यांची पोलिसांनी दोनवेळा चौकशी केली. या चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केल्यामुळे अटक केली आहे. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री, पोलीस तपासातून समोर आले आहे. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला होता. शीतल तेजवानी विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Arrest the seller, why not the buyer?: Danve's question to Pawar.

Web Summary : Sheetal Tejwani's arrest in a Pune land scam raises questions about Parth Pawar's involvement. Ambadas Danve challenges Fadnavis, asking why the buyer isn't arrested and demanding transparency on stamp duty waivers.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेPuneपुणेparth pawarपार्थ पवार