शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 18:52 IST

Nana Patole : खासदार संजय राऊत यांच्या लेखातील वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

Sanjay Raut vs Nana Patole : लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू मै मै सुरु झालं होतं. काँग्रसेच्या नेत्यांना नौटंकी बंद करण्याचे आवाहन केल्याचे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी संजय राऊतांनी आपली नौटंकी थांबवावी असं म्हटलं होतं. आता निवडणूक संपल्यानंतर पु्न्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक सुरु झाल्याचे पाहायला मिळतय.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील एका लेखावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. ७०  वर्षात भारताने लोकशाहीचा साफ कचरा केल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे. यावरुनच नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसने केल्याचे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी राऊतांना दिलंय.

"तुम्ही १०० टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही २० टक्के राजकारण आणि ८० समाजकारण करतो. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या गावात पाणी, दवाखाना, त्यांचे बाळंतपण जिथे झाले ते काँग्रेसने निर्माण केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवण्याचे कामही काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणार. संजय राऊत अतिविद्वान आहेत आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे तिथून ते काय जास्त शिकून आलेत ते मला माहिती नाही," असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं?

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात इंग्लंडमधील निवडणुकीच्या पद्धतीबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी भारतातल्या निवडणूक पद्धतीबाबतही भाष्य केलं. "सत्तर वर्षांत भारताने लोकशाहीचा साफ कचरा केला. गेल्या दहा वर्षांत तो सगळय़ात जास्त झाला, पण इंग्लंडमध्ये लोकशाहीची मशाल पेटताना दिसत आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे लोकशाही मार्गाने संसदेत निवडून आले व इंग्लंडच्या संकटकाळात ते त्या महान देशाचे पंतप्रधान झाले. ज्या देशावर आम्ही राज्य केले त्या देशाचा माणूस आम्हाला पंतप्रधान म्हणून चालणार नाही, असे गळा फाडून बोलणारा नकली राष्ट्रवाद तेथे सुनक यांना विरोध करण्यास उभा राहिला नाही," असे संजय राऊत यांनी आपल्या  लेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस