"संघाने सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे’’, काँग्रेसचा खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:40 IST2025-09-29T19:39:36+5:302025-09-29T19:40:00+5:30
Harshwardhan Sapkal News: संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असा खोचक सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

"संघाने सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे’’, काँग्रेसचा खोचक सल्ला
मुंबई/नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असा खोचक सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सकाळी ६ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्यागग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, सुनिल केदार, अनिस अहमद, राजेंद्र मुळक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्वभारतीयांनी काम करावे आणि संविधानाचे सत्य सर्वदूर पसारावे हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यावेळी तुषार गांधी म्हणाले की, लोकशाही व संविधान व लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी व सर्वसामान्य जनता यात सहभागी झालेली आहे.