दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 15:36 IST2023-10-03T15:35:32+5:302023-10-03T15:36:06+5:30

संजय राऊत म्हणजे संजय शिरसाट नाही. ज्या संजय राऊतांनी ईडी आणि भाजप समोर गुडघे टेकले नाही. - सुनील राऊत

The result will come before the Dussehra gathering; Sunil Raut's reply to Sanjay Shirsat, Nitesh Rane too | दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर

दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर

संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाटांनी जोरदार टीका केली होती. यावरून आता शिरसाट आणि राऊत बंधुंमध्ये जुंपली आहे.  संजय शिरसाट यांनी आम्हाला शिकवू नये. जो माणूस एक ईडीची नोटीस आली आणि 10-50 कोटी साठी मिंधे गटात पळाले, ते काय शिकवणार? खरी निष्ठा आमच्याकडे आहे, असे प्रत्यूत्तर सुनील राऊत यांनी दिली आहे. 

संजय राऊत म्हणजे संजय शिरसाट नाही. ज्या संजय राऊतांनी ईडी आणि भाजप समोर गुडघे टेकले नाही. परंतु जेल पत्करले, त्यांच्याबाबत आम्हाला संजय शिरसाटांकडून शिकण्याची गरज नाही. नितेश राणे, त्या दीड फुटावरती काय बोलणार? काल प्रकाश आंबेडकर यांनी फार चांगलं वक्तव्य बोललेल आहे, चिंधीचोर. हा चिंधीचोरचा मुलगा आहे. त्याला भुंकण्यासाठी फक्त ठेवलेला आहे, अशी टीका राऊत यांनी केली. 

दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार. ओरिजनल शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. दसरा मेळाव्याच्या आधी निकाल लागेल. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क वर दसरा मेळावा घेतलेला आहे, हा इतिहास आहे. जेवढे खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून गेलेले आहेत, त्या सर्व जागेवर भारतीय जनता पार्टी क्लेम करेल, असा दावाही सुनील राऊत यांनी केला आहे. 

आम्हाला चिरडून टाका, आर्मी बोलवा, पण आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल, असे थेट आव्हान खा. संजय राऊतांनी शिंदे गटाला दिले. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना चिरडायला आर्मीची काय गरज आहे? खटमल आहेत ते. राहिला विषय शिवतीर्थाचा, शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या विचारांचीच सभा होईल, असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. 

Web Title: The result will come before the Dussehra gathering; Sunil Raut's reply to Sanjay Shirsat, Nitesh Rane too