लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र, हा निर्णय खा. सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, मी त्या प्रक्रियेत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले.
दोन्हीकडचे नेते एकाच विचारधारेचेप्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासंबंधी विधाने केली.पवार म्हणाले, दोन्ही पक्षांचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. काहींना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर अजित पवार यांच्याबरोबर जावे, काहींना वाटते जाऊ नये. एकत्र यायचे की नाही याचा निर्णय आमच्या खासदार सुप्रिया सुळे घेतील.