हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांविरोधात सकल हिंदू समाज एकवटला; अनेक शहरात मूक मोर्चाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:24 PM2022-07-24T17:24:13+5:302022-07-24T17:25:39+5:30

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्लीसह अनेक राज्यात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याच्या निषेधार्थ विविध शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.

The entire Hindu community united against the killings and attacks on Hindus; Silent march organized in many cities | हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांविरोधात सकल हिंदू समाज एकवटला; अनेक शहरात मूक मोर्चाचे आयोजन

हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांविरोधात सकल हिंदू समाज एकवटला; अनेक शहरात मूक मोर्चाचे आयोजन

googlenewsNext

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात हिंदूंच्या हत्येचे सत्र वाढले आहे. देशातील अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर एका विशिष्ट धर्माकडून हिंदूंना टार्गेट केले जात आहे. याविरोधात आज राज्यभर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.

देशात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याचा निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल हिंदू समाज एकवटला. यावेळी या मोर्चात विविध धर्मातील प्रमुख लोकांची उपस्थिती होती. शहरातील पैठण गेट येथून मोर्चाला सुरुवात होऊन औरंगपुरा इथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. इस्लामिक जिहाविरोधात हा मूक मोर्चा असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. 

तिकडे, नांदेडमध्येही सकल हिंदू समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आला. विश्व हिंदू परिषद आणि हिंदूत्ववादी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. शहरातील जुना सराफा मधून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन विविध राज्यात हिंदूच्या हत्या, हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणीचे निवेदन दिले. 

बीडमध्येही सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शहरातील बालाजी मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली तर सहयोग नगर येथील गणेश मंदिर परिसरात मोर्चाची सांगता करण्यात आलीय. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्ली या राज्यात हिंदूंची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भावना व्यक्त करण्यास शब्द नाहीत. त्यामुळे काळ्या फिती बांधत मूक मोर्चा काढण्यात आला असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

अनेक शहरात मोर्चाचे आयोजन
औरंगाबाद, नांदेड, बीड या शहरांसह मुंबई, जळगाव, पैठण, चाकूर, परभणी आणि अनेक शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह भाजप, शिवसेना, मनसे असे सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. देशभरात जिहाद वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व मोर्चांमध्ये महिला आणि तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभागा होता.

Web Title: The entire Hindu community united against the killings and attacks on Hindus; Silent march organized in many cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.