शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
2
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
3
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
4
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
5
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
6
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
7
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
8
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
9
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
10
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
11
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
12
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
13
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
14
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
15
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
16
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
17
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
18
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
19
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
20
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...

प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 19:18 IST

Praveen Darekar News: वसई येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना येथील अपुलँड बॅक्वेट हॉलमधील लिफ्ट अचानक बंद झाल्याने प्रवीण दरेकर यांच्यासह इतर काही जण लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करून या लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांची सुखरूप सुटका करण्यात आली.  

महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर हे आज वसई दौऱ्यावर आले असताना मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. वसई येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना येथील अपुलँड बॅक्वेट हॉलमधील लिफ्ट अचानक बंद झाल्याने प्रवीण दरेकर यांच्यासह इतर काही जण लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करून या लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांची सुखरूप सुटका करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाबाबत मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी प्रवीण दरेकर हे  वसई पश्चिम येथील कौल हेरिटेज सिटीमधीधील अपुलँड ग्रँड बॅक्वेट हॉल येथे आले होते. त्यावेळी प्रवीण दरेकर हे येथील लिफ्टने जात असताना ही दुर्घटना घडली. लिफ्टमध्ये १० माणसांची क्षमता असताना १७ माणसांनी प्रवेश केल्याने ही लिफ्ट बंद पडली. लिफ्ट अचानक बंद पडल्याने तिथे उपस्थित असलेल्यांची तारांबळ उडाली.

सुमारे पाच ते दहा मिनिटे प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, खूप प्रयत्नांनंतर लोखंडी रॉड आणि इतर वस्तूंच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर आणि इतरांची बंद पडलेल्या लिफ्टमधून सुटका करण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हेसुद्धा लिफ्टमध्ये होते. लिफ्टमधून सुटका झाल्यानंतर सर्व नेते कार्यक्रमस्थळी रवाना झाले. 

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरVasai Virarवसई विरारBJPभाजपाAccidentअपघात