पालकमंत्री निवडीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भुजबळांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:29 IST2025-08-23T12:29:01+5:302025-08-23T12:29:55+5:30
विधानभवनात झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले

पालकमंत्री निवडीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भुजबळांना टोला
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून काही मान्यवर आमचे इतके आमदार आहेत, असा दावा करतात. मात्र, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. पालकमंत्री नसतानाही या जिल्ह्याची कामे सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे यापुढे पत्रकारांनी हा प्रश्न विचारू नये, असे सांगत स्वपक्षीय मंत्री छगन भुजबळ यांनाही अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. विधानभवनात झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कामकाज सुरळीत चालू
नाशिक व रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना व राष्ट्रवादीत वाद उफाळला आहे. गोगावले यांनी या पालकमंत्री पदावर शिंदेचा दावा असल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिल्यानंतर आता त्यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर अप्रत्यक्षपणे दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
रायगडमध्ये केवळ एक
आमदार असताना राष्ट्रवादीला पालकमंत्री पद मिळाले होते. नाशिकला राष्ट्रवादीचे ७आमदार असल्याने पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळावे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. याबाबत अजित पवार यांना विचारले असता लकमंत्री नेमण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नसतानाही तेथे कोणतीही अडचण आलेली नाही. तेथील कामे सुरळीत सुरू आहेत. असे पवार म्हणाले.