मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:52 AM2024-03-01T06:52:20+5:302024-03-01T06:52:40+5:30

शरद पवारांचे आमंत्रण, बारामतीत शनिवारी ‘नमो’ रोजगार मेळावा

The Chief Minister and both the Deputy Chief Ministers should come to 'Govindbage' for dinner; The uncle embarrassed the nephew | मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती (जि. पुणे) : बारामतीत शनिवारी ‘नमो’ रोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भोजनाचे खास आमंत्रण दिले आहे.

याबाबत शरद पवार यांनी या तिन्ही नेत्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, आपण शनिवारी (दि. २) बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. संसद सदस्य नात्याने मला व सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, येथील मैदानात होत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले यथोचित स्वागत करू इच्छितो.

काय म्हटले पत्रात?
आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग’ ह्या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणांस दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. 
कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचादेखील स्वीकार करावा, असे पवारांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

Web Title: The Chief Minister and both the Deputy Chief Ministers should come to 'Govindbage' for dinner; The uncle embarrassed the nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.