शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 05:22 IST

मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून, ती लुटण्याचे काम सुरू आहे. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील एक लाख कोटी रुपये किमतीची जमीन एका व्यक्तीला दिली जात आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत मविआ सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेसाठी काय करणार, याची माहिती दिली.

मुंबईतील धारावी ही लघू व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करून धारावी अदानींच्या घशात घालण्यास सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावी पुरता मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधित आहे. देशातील विमानतळे, संरक्षण साहित्य बनविण्याचे काम, बंदरे, ऊर्जा निर्मिती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूसाला भाव नाही, तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. भाजप सरकारने नोकरभरती न करता महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सारखे तब्बल ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर घालविले. ५ लाख युवकांचे रोजगारही  बाहेर गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

- मविआची सत्ता आल्यानंतर महिलांना महिना ३ हजार, एसटीचा मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कापसाला योग्य भाव, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा देणार.

- बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता, अडीच लाख रिक्त सरकारी पदांची भरती, जातनिहाय जनगणना, ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटविणे यावरही भर दिला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या गॅरंटी व मविआच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस