कार्यकर्ता म्हणाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार-शरद पवार...; अजित दादांनी मारली टपली, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 22:04 IST2023-05-02T22:03:42+5:302023-05-02T22:04:08+5:30
पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत अनेक नाराज कार्यकर्ते वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर आडून बसले होते.

कार्यकर्ता म्हणाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार-शरद पवार...; अजित दादांनी मारली टपली, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी अचानकच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्यासंदर्भात घोषणा केली. तसेच यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही उपस्थित होते. यानंतर, पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत अनेक नाराज कार्यकर्ते वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर आडून बसले होते.
यानंतर, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूनत काढली. तसेच, साहेबांनी आपल्या सर्वांना, या निर्णयावर विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. याच बरोबर, सर्व कार्यक्रर्त्यांना काही खाऊन घेण्यास सांगितले आहे, असे सांगितले. यानंतर येथून जाताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
या व्हडिओमध्ये दिसत आहे, एक कार्य कर्ता अत्यंत जोशात आला आणि म्हणाला,"महाराष्ट्राचा बुलंद आवाज..., यावर इतर कार्यकर्त्ये म्हणाले, शरद पवार- शरद पवार..., यावर अजित दादांनी त्या कार्यकर्त्याला हसत हसत टपली मारली आणि म्हणाले, आरे महाराष्ट्राच काय भारताचा बुलंद आवाज!" आणि तेथून निघून गेले.
कार्यकर्ता म्हणाला महाराष्ट्राचा बुलंद आवाज
— Suraj Masurkar (@SurajMasurkar9) May 2, 2023
शरद पवार- शरद पवार
“आरे भारताचा बुलंद आवाज म्हण!”
अजित पवारांची कार्यकर्त्याला टपली 😂🤣#ajitpawar#sharadpawar#राष्ट्रवादी#Ncppic.twitter.com/BbllDZsfra
याच बरोबर, "आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी आले होते. असे काही होईल हा सर्वांसाठीच शॉक होता. कार्यक्रमानंतर आम्ही सर्वजण सिल्व्हर ओकला गेलो. तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर विचार करायला दोन ते तीन दिवस द्या, असे शरद पवारांनी म्हटले आहे. माझ्यावर अवलंबून असतील तर माझे ऐकलेच पाहिजे, असा पवार साहेबांचा निरोप आहे. हट्टीपणा बरोबर नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी जावे" असे अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.