तो त्याग तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी होता - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:38 IST2022-07-02T12:38:11+5:302022-07-02T12:38:36+5:30

भाजपच्या आमदारांशी फडणवीस यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी मला काल फोन केला. मी त्यांना सांगितले की मी या मंत्रिमंडळात कोणतेही मंत्रिपद घेणार नाही. 

That sacrifice was not for you, it was for me says Fadnavis | तो त्याग तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी होता - फडणवीस

तो त्याग तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी होता - फडणवीस

मुंबई : तीन दिवसांपूर्वी मी तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना, ‘त्याग करावा लागेल’ असे बोललो होतो. तुमच्यापैकी काहींना वाटले असेल की, मंत्रिपदाचा त्याग करावा लागेल की काय पण तो त्याग तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी होता या शब्दांत मुख्यमंत्री होणार नसल्याची पूर्वकल्पना होती, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या आमदारांशी फडणवीस यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी मला काल फोन केला. मी त्यांना सांगितले की मी या मंत्रिमंडळात कोणतेही मंत्रिपद घेणार नाही. 

तेव्हा मोदीजी मला म्हणाले की, पक्षाचा एक नेता म्हणून तुम्ही तसे बोलले आहात पण आज पक्ष तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सांगत आहे. त्यावर आपण अंमल करायला हवा. त्यांच्या तसेच आमचे नेते अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्या निर्देशांचे पालन मी केले. आपल्या हातात पुढची अडीच वर्षे आहेत. 

समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आपल्याला सगळी ताकद पणाला लावून या निवडणुका जिंकायच्या आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Read in English

Web Title: That sacrifice was not for you, it was for me says Fadnavis