शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:29 IST

"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शपथविधी कार्यक्रमात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासंदर्भात बोलताना "एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर, आता शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पलटवार करत, "शिंदे यांच्या नेतृत्वात 40 चे 62 आमदार झाले. तसेच, संजय राऊतांपासूनउद्धव ठाकरे गटाला मोठा धोका आहे," असे देसाई यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, काल भाजपचे एकनाथ शिंदे यांना वगळून शपथ घेण्याचे नियोजन होते, कसे बघता? असा प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी एक भूमिका घेतली, ती संख्या ४० वरून ६२ वर गेली. संजय राऊत काय बोलले, त्यातले खरे ठरले? यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघू नका. उलट, संजय राऊतांपासून उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे." देसाई टीव्ही९ सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र... -देसाई पुढे म्हणाले, "मी मागाशीही बोललो की, उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र आहेत. जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले, सभागृहामध्ये किंवा सभागृहाबाहेर आम्ही वेगवेगळ्या राजकीय भूमिका जरी मांडत असलो, तरी मित्र म्हणून आमचे बोलणे होते. मित्र म्हणून आम्ही एकत्र बसतो. तेव्हा अनेक तिकडचे उद्धव ठाकरे गटातलेसुद्धा लोक खाजगीत सांगतात की, यांच्या (संजय राऊत) बोलण्यामुळे, यांच्या वागण्यामुळे दुर्दैवाने उद्धव ठाकरे गटावर ही वेळ आलेली आहे." एवढेच नाही, तर "यामुळे, हा सावधानतेचा इशारा आहे, सावधगिरीचा एक इशारा आहे राऊतांना की, त्यांनी आता स्वतःला थोडासा आवर घालावा. नाहीतर राहिल्या साहिल्या उद्धव ठाकरे गटाची काय अवस्था होईल, हे कोणीच सांगू शकणार नाही," असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे