शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आरोप करणा-यांना बांधील नाही, राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:34 IST

नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे.

मुंबई, दि. 30 - नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे. कोटयावधी रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नसते तर, मुंबईतून पाण्याचा निचरा झाला नसता असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मी ख-या मुंबईकरांना बांधील आहे. आरोप करणा-यांना मी बांधील नाही, कालच्या घटनेचे राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही असे उद्धव म्हणाले.  आरोप करणा-यांनी मुंबईत काल काय केले याची शहानिशा करा. शिवसेनेचे आमदार, महापौरांनी रस्त्यावर उतरुन काम केले असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. मंगळवारी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर काहीवेळात मुंबापुरीची तुंबापुरी झाली. लोकांचे अक्षरक्ष हाल झाले. नेहमी धावणा-या मुंबईला ब्रेक लागला. या सर्व परिस्थितीसाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या पावसाची 26 जुलैच्या पावसाबरोबर तुलना करत असाल तर, निश्चितच मुंबईत 26 जुलैसारखी परिस्थिती नव्हती. महापालिकेने चांगल्या पद्धतीने काम केले असे उद्धव यांनी सांगितले. मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, अतिवृष्टी होईल असे वाटले नव्हते. मुंबईत पंपिंग स्टेशन्समधून सहा ते आठ हजार दशलक्ष लीटर पाणी बाहेर काढलं असे उद्धव म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाताना एका क्षणाला उद्धव यांनी जनतेची सेवा करतो म्हणून जनतेने वारंवार आशिर्वाद दिला आहे असे सांगितले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने मिठी नदीत पूर आला नाही असे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले. निर्सगाशी एका मर्यादेपर्यंत लढू शकतो असे उद्धव म्हणाले. 

काल मुंबईत भरपूर पाऊस झालाय हे आजच्या मुंबईकडे पाहून वाटत नाही. महापालिका, बीईएसटी कर्मचारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जनतेची मदत करत होते असे उद्धव यांनी सांगितले. पावसानंतर आता रस्त्यांवर कचरा असून, रोगराई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेना मुंबईकरांसाठी उद्यापासून आरोग्य शिबिर सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी मुंबईच्या आकाशात 9 किलोमीटर उंचीचा ढग होता, सुदैवाने ढग फुटी झाली नाही अन्यथा काय परिस्थिती उदभवली असती याची कल्पनाही करता येत नाही असे उद्धव म्हणाले. मंगळवारी संपूर्ण मुंबईत 325 मिमी पाऊस झाला, 26 ठिकाणी एका तासात 50 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. 3 ते 5 या वेळेत 60 टक्के पाऊस झाला अशी माहिती महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली. 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका