शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Thackeray Movie: धमकी देण्याची शिवसेनेची हिंमतच कशी होते?- अंजली दमानिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 10:45 PM

२५ जानेवारीला 'ठाकरे' शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेच्या अधिकाऱ्यानं दिली होती.

मुंबई: ठाकरे चित्रपट प्रदर्शित होईल, त्या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरेंनी दिला होता. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. 'धमकी देण्याची शिवसेनेची हिंमत होतेच कशी? राज्यात गुंडांचं राज्य आहे का?' असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले. अशा धमक्या देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवं, अशी मागणीदेखील त्यांनी केली.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस असलेल्या बाळा लोकरेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. 'ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही,' असं लोकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं. यासोबतच एका वृत्तवाहिनीशी बोलताना, या दिवशी दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलनं उत्तर देऊ, असा इशारादेखील दिला. यावरुन वाद निर्माण होताच शिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. ते लोकरे यांचं वैयक्तिक मत असून ती शिवसेनेची भूमिका नाही, असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणानंतरदेखील हा वाद शमलेला नाही. अंजली दमानियांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे. गृह मंत्रालय, महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी कारवाई करणार का? राज्यात गुंडांचं राज्य आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 'ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगना रानौतचा मणिकर्णिका आणि इम्रान हाश्मीचा चीट इंडियादेखील प्रदर्शित होणार आहे. त्या दिवशी इतर कोणतेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी देणारा लोकरे कोण? ' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Thackeray movieठाकरे सिनेमाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाanjali damaniaअंजली दमानिया