“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 11:28 AM2023-12-16T11:28:55+5:302023-12-16T11:31:18+5:30

Sanjay Raut: धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत, त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

thackeray group sanjay raut criticised over dharavi redevelopment project | “देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

Sanjay Raut: धारावी पुनर्विकासावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अदानी ग्रुपवर जोरदार टीका केली आहे. तसेच धारावी विकासासंदर्भात अदानी कार्यालयावर ठाकरे गट आज एक मोठा मोर्चाही काढत आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धारावी पुनर्विकासावरून जोरदार टीका केली आहे. 

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील टीडीआर प्रकल्प आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे फार मोठे कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

धारावीच्या पोरांना ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्या आहेत का? 

गेल्या काही काळात सातत्याने गुजरातमध्ये ड्रग्स उतरत आहे. ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देणार असतील तर पूर्ण मुंबईत ड्रग्सचा व्यापार करायचा आहे का, अशी शंका आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्या आहेत का? धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा धरून कोवळा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई विकण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा कुठे होत असेल तर तो धारावीत पुनर्विकास प्रकल्पात होत आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, भाजपचे जावई गौतम अदानी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केला आहे, असा तो प्रकल्प केला आहे. धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत. पण हा प्रकल्प सरकार का करत नाही. सरकारने जॉइन्ट वेंचरमध्ये प्रकल्प करावा, असा सल्ला यावेळी संजय राऊत यांनी दिला.


 

Web Title: thackeray group sanjay raut criticised over dharavi redevelopment project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.