शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:42 IST

महाराष्ट्र संकटात आहे, नागपूरमध्ये पूर आलाय, अनेक भागात दुष्काळ आहे. मुख्यमंत्री तिथे असायला हवेत. पण तुम्ही उत्सव साजरा करतायेत असं राऊतांनी टीका केली.

मुंबई – आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही तिथे जाण्याची गरज काय? असं विचारले, कुठल्या ठिकाणी भेट देणार आहे असं विचारले. मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा, का? कशासाठी, महाराष्ट्राला गरज काय आहे?. नागपूर पाण्यात बुडलंय, तिथे तुम्ही गेला नाही. नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई, नागपूरात काय घडत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घरी कॅमेरे फिरतायेत, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड जमा होतंय. तुम्ही परदेश दौऱ्यावर कोणती गुंतवणूक आणायला चालला आहात. जी गुंतवणूक गुजरातमध्ये गेलीय ती पहिली आणा. मुंबईतून मोठमोठे आंतरराष्ट्रीय संस्था, कार्यालये अहमदाबादला जातायेत ते आणा त्यानंतर परदेश दौऱ्यावर जा. परदेश दौरा रद्द केला, भीती असायला हवी. ही भीती आदित्य ठाकरेंची आहे, शिवसेनेची आहे, जनतेची आहे. ती असायला हवी असंही त्यांनी म्हटलं.

तसेच महाराष्ट्र संकटात आहे, नागपूरमध्ये पूर आलाय, अनेक भागात दुष्काळ आहे. मुख्यमंत्री तिथे असायला हवेत. पण तुम्ही उत्सव साजरा करतायेत. गणपती उत्सव साजरा करू नका हे मी म्हणत नाही. परंतु ज्यारितीने अनेक हिरो-हिरोईन, खान वैगेरे येतायेत, मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंब मज्जा घेतायेत आणि राज्यातील जनता दु:खाच्या डोंगराखाली दबली आहे. ही आज राज्याची हालत आहे असंही खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द झाला. महाराष्ट्रात दुष्काळ आहे हे आदित्य ठाकरेंनी ट्विट केल्यावर समजलं, दु:खद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असले पाहिजे याचे नैतिक भान त्यांना असायला हवे. कलाकार कुठेही नाचतील, उद्या दुसरा मुख्यमंत्री बसला तिथेही जातील. ते येतात आणि जातात. परंतु विघ्नहर्ता गणपती असतानाही राज्यावर विघ्न आलेले आहे. हे विघ्न दूर करण्याची राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना तुम्ही दुष्काळग्रस्त भाग असो वा नागपूर पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेलेला आहात? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे