शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:06 PM

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला.

ठळक मुद्देपुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केलाधीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील

यवतमाळ - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. दरम्यान,  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना रोखठोक इशारा दिला आहे. ''पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो.  या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.  दहशतवादी संघटनांची जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशाराच मोदी यांनी दिला. 

 यावेळी २०१४ मध्ये याच मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला येऊन गेल्याचे मोदींनी स्मरण करून दिले. दाभडीला शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे मोदी यांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षात शेकडो योजनांचा शिलान्यास केल्याचे मोदी म्हणाले. आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर केल्याचे सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाच्या चाबीचे वितरण करण्यात आले. शिवाय गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी नागपुरातील अजनी ते पुणे या हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याचे थेट प्रेक्षपण करण्यात आले. बचत गटासाठी भाजपा सरकारने आणलेल्या योजनांची चित्रफित कार्यक्रमस्थळी दाखविली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतYavatmalयवतमाळpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला