शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल 20 दिवसांत शाळांकडून विभागीय मंडळांकडे - शिक्षण मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 07:20 IST

Board of Education : विषय शिक्षक आणि वर्गशिक्षकांना ११ जूनपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण संकलित करून ते निकाल समितीला सादर करायचे आहेत.

मुंबई :  दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाने निकाल लावण्याचा निर्णय शिक्षण विभाग व राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानंतर बुधवारी मूल्यमान पद्धत कशी असावी, याचा तपशील आणि वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले. त्यानुसार निकाल जाहीर करण्यासाठी शाळेतील ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करून २० ते २५ दिवसांत निकाल विभागीय मंडळांकडे सादर करावा लागणार आहे.विषय शिक्षक आणि वर्गशिक्षकांना ११ जूनपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण संकलित करून ते निकाल समितीला सादर करायचे आहेत. तर त्यापुढील १० दिवसांत निकाल समिती व मुख्याध्यापकांना ते गुण प्रमाणित करून, प्रणालीमध्ये भरून त्यानंतर विभागीय मंडळात सादर करायचे आहेत. निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालाच्या २ प्रती तयार करायच्या असून, त्यातील एक प्रत मुख्याध्यापकांकडे तर दुसरी विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या नववीच्या संकलित निकालाची प्रतही मुख्याध्यापकांना विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असे हाेणार गुणदानदहावीचे गुणदान करताना पहिल्या ५० गुणांसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या १००पैकी असलेल्या गुणांचे शाळास्तरावर ५० टक्के गुणांत रूपांतर करायचे आहे. उरलेल्या ५० गुणांसाठी दहावीच्या यंदाच्या अंतर्गत लेखी गुणांचे ३० गुणांत रूपांतर करायचे आहे.अपवादात्मक परिस्थितीत जर शाळेत प्रथम सत्र किंवा सर्व परीक्षा झाल्या नसतील तर दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित सर्व चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प, स्वाध्याय यांचे शिक्षकांना ३०पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज शिक्षकांना प्रशिक्षणमुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून गुरुवारी दुपारी ११ ते १ दरम्यान मंडळाच्या यू ट्यूब चॅनेलवरून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिक्षक, मुख्याध्यापक संभ्रमातअजूनही अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊनपूर्णपणे शिथील नसताना, शिक्षकशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या, यावर्षीच्या अभिलेखांचे गुण कसे संकलित करणार? आणि १० दिवसांत गुणदान कसे करणार, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांना पडल्याने ते संभ्रमात आहेत.

काम आव्हानात्मकमूल्यमापन पद्धतीच्या तपशिलात अनेक संभ्रम आहेत. निकालाचे काम निश्चितच आव्हानात्मक आहे. आजच्या प्रशिक्षण कार्यशाळेनंतर कदाचित आमच्या शंकांचे समाधान होऊन उत्तरे मिळू शकतील आणि निकाल तयार करण्यात मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.- पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण