शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव भाजपात बंडखोरी!

By admin | Updated: March 25, 2015 02:13 IST

भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांचे समर्थक स्वप्निल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला असला, तरी भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांचे समर्थक स्वप्निल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने सुमनतार्इंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचदिवशी सर्वच पक्षांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे निवडणूक लढविण्याबाबत आग्रही असल्यामुळे भाजपचा निर्णय उशिरा झाला. भाजपनेही सुमनतार्इंना पाठिंबा दिला. त्यानंतरही घोरपडे समर्थक आक्रमक होते. २२ मार्चला झालेल्या एका बैठकीत घोरपडे यांनी स्वप्निल पाटील यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते. त्यानुसार मंगळवारी त्यांचे समर्थक व भाजप कार्यकर्ते स्वप्निल पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने पोटनिवडणुकीत बंडखोरीचा झेंडा फडकला आहे. (वार्ताहर)