तासगाव (जि. सांगली) : फरशांनी भरलेला ट्रक मणेराजुरी येथे उलटून त्यातून प्रवास करणारे १० मजूर जागीच मरण पावले, तर २२ जण जखमी झाले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. हे सारे जण फरशांच्या खाली दबले गेले. कर्नाटकमधील विजापूर, गुलबर्गा परिसरातील ते रहिवासी आहेत.हे मजूर कराड, सातारा भागात वीटभट्टी व अन्य मजुरीचे काम करीत होते. दिवाळी आटोपून ते शहाबादहून ट्रकमध्ये बसले होते. काही जण केबिनमध्ये, काही टपावर, तर काही ट्रकमधील फरशांवरच बसले होते.>जेसीबीच्या साह्याने काढले बाहेरफरशांखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे अशक्य होते. क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेण्यात आला. त्यानंतर फरशांचा ढिगारा जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून दहाही मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले.
सांगलीत फरशीचा ट्रक उलटून १० मजूर ठार, तर २२ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 07:26 IST