संतोष येलकरअकोला : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना केला.नावे न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यातील १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढविण्याची तयारी दर्शविल्याचे संकेतही अॅड. आंबेडकर यांनी दिले. पक्षाची रणनीती, कोणाशी युती-आघाडी करणार, यासंदर्भातील भूमिका ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 06:33 IST