The temperature will continue to rise in the next two days in the state including Pune | पुण्यासह राज्यातील तापमानात पुढील दोन दिवस वाढ राहणार कायम 

पुण्यासह राज्यातील तापमानात पुढील दोन दिवस वाढ राहणार कायम 

ठळक मुद्देमध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरात जास्ता दाबाचे क्षेत्र तयार

पुणे :उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. त्यामुळे राज्यातील तापमानात घट होत असते. त्याप्रमाणे आताही उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे येतील अशी अपेक्षा होती. परंतु, मध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरात जास्ता दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे अजूनही दक्षिणेकडून वारे येत आहे. या वार्यांबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारेही असल्याने आपल्याकडे काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. याचा परिणाम जानेवारीमध्येही सकाळी जाणवणारी थंडीही कमी झाली आहे. रात्री फॅन लावावा लागत आहे. अजून किमान दोन दिवस ही परिस्थती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढल्यास आपल्याकडे थंडी परतण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर किमान तापमान १८ ते २० अंशावर गेल्याने गरम कपडे गुंडाळून ठेवण्याची स्थिती सध्या आली आहे. राज्यात सर्व ठिकाणी कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले दिसून येत आहे. हवामानातील या बदलामुळे या हंगामात राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता धुसर झाली आहे.

पुण्यात आज कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते २.९ अंशाने अधिक आहे. किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली ते सरासरीच्या तुलनेत ७.१ अंशाने अधिक आहे. पुढील दोन दिवसात त्यात घट होण्याची शक्यता असून २१ जानेवारी रोजी ते सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The temperature will continue to rise in the next two days in the state including Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.