शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनीच घेतला टीईटी परीक्षेचा धसका!

By admin | Updated: November 3, 2014 04:05 IST

राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी या परीक्षेत सुमारे ९५ टक्के उमेदवार नापास झाल्याने यंदाच्या परीक्षेचा शिक्षकांनी धसका घेतला आहे. गेल्या वर्षी सहा लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच या परीक्षेसाठी अर्ज केला असल्याने शिक्षकांनीच या परीक्षेकडे पाठ फिरवली आहे, असे दिसते़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचा कार्यक्रम आॅक्टोबरमध्ये जाहीर केला होता. त्यानुसार डी.एड., बी.एड.धारक शिक्षकांना २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार होते. यंदा या परीक्षेसाठी केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच अर्ज केले असून त्यांची परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तर अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांना १ ते १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याची माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी टीईटी परीक्षा १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांपैकी पहिली ते पाचवीसाठीचे ४.४३ टक्के आणि सहावी ते ८ वीसाठीचे केवळ ५.९५ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले होते. तर या परीक्षेत ९५ टक्के शिक्षक नापास झाल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले होते. या परीक्षेनंतर डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक शिक्षक परीक्षेला बसणे अपेक्षित होते. परंतु पहिल्या परीक्षेच्या निकालाचा शिक्षकांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत अधिकाधिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत, यासाठी परीक्षेत विशेष सूट देण्यात आली होती.तरीही डी.एड., बी.एड. झालेल्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ६० टक्के गुणही मिळविता आले नव्हते. यामुळे यंदाच्या परीक्षेकडे लाखो शिक्षकांनी पाठ फिरवल्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)