शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 7:06 AM

कोकणाला तडाखा; रायगड, पालघर, ठाण्याला इशारा, शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुंबई/पणजी : अरबी समुद्रात उठलेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ गोव्यासह कोकणपट्टीत प्रचंड धुमाकूळ घालत मोठी पडझड करून वायव्येला गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. सोमवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात शनिवार रात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला असून जळगाव जिल्ह्यात झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार झाल्याची घटना घडली. ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी हे चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली. 

वादळामुळे चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून दोन बहिणी ठार झाल्याची घटना अंचलवाडी (जि. जळगाव) येथे रविवारी घडली. ज्योती (१६) व रोशनी बल्लू बारेला (१०) अशी त्यांची नावे आहेत. सिंधुदुर्गमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून वादळाने मुसळधार पावसासह धुमाकूळ घातला असून समुद्र खवळला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोसळली, तर घरांचेही नुकसान वादळाची तीव्रता वाढली, आज वळणार गुजरातकडे झाले. नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील किनारपट्टीला वादळाचा जोरदार तडाखा बसला. ताशी १२० ते १३० किलाेमीटर वेगाने वारे वाहात होते. अनेक भागातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. रविवारी सकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला.

मुंबईसह कोकणाला धोका नाहीचक्रीवादळाचे मार्गक्रमण वायव्येच्या दिशेने होत असल्यामुळे कोकणसह मुंबई किनारपट्टीला ते धडकणार नाही. परंतु गुजरातच्या पोरबंदरसह इतर किनारी भागाला ताशी १७५ किलोमीटर वेगाने धडक देणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा गोवा किनारपट्टी भागातून वायव्येच्या दिशेने पुढे पोहोचला होता. त्यामुळे गोव्यातील प्रभाव ओसरत चालला होता, तर कोकणसह महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव अधिक वाढला होता.

गोव्यात झाडे उन्मळून पडली, बोटी भरकटल्या

  • ताशी १४५ ते १७० गतीने धावणाऱ्या या वादळाने झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. वीज खांब पाडून वीजपुरवठा खंडित झाला. समुद्रातील मालवाहू बार्जीही भरकटवून टाकल्या. 
  • पहाटे ४ वाजल्यापासून चक्रीवादळाचा प्रभाव वाढला होता. विशेषत: दक्षिण गोव्यात मोठी पडझड झाली. उंच लाटा किनाऱ्याला आदळून काही भागात लोकांच्या घरांपर्यंत पाणी शिरले. नंतर त्याचा प्रभाव आणखी वाढला. 
  • १०.३० च्या सुमारास पणजीपासून अवघ्या १०६ किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ पोहोचले होते. महाराष्ट्रातून गोव्याला वीज पुरवणारी २२० केव्ही वीजवाहिनी निकामी झाली. अनेक ठिकाणी ३३ केव्ही फीडर बंद झाले त्यामुळे बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला.
टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ