शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:26 IST

Eknath Shinde Mahayuti: मुख्यमंत्री कोण आणि खातेवाटपावरून महायुतीत पेच अडकल्याची चर्चा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्याबद्दल उदय सामंत यांनी भाष्य केले. 

Mahayuti Maharashtra News : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीच्या सत्ता स्थापनेचं घोडं नेमकं कुठे अडलंय, याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडल्यानंतर नाव जाहीर होईल असे बोलले जात होते. पण, अद्यापही नाव जाहीर झालेलं नाही. त्यात आता एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याचे, तसेच शिवसेनेला गृह खाते हवे असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 

शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीत झालेल्या बैठकीबद्दल विचारण्यात आले. सामंत म्हणाले, "याबाबतील माहिती एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांना दिली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदेंची भूमिका सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय होईल."

शिंदेंचा फोटो, उदय सामंत म्हणाले...

एकनाथ शिंदे यांचा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.  शिंदे नाराज असल्याची चर्चा होत आहे, असेही सामंत यांना विचारण्यात आले.

"मला हल्ली लॉजिकचं कळेना झालंय की, एखादा फोटो बघून एकनाथ शिंदे नाराज आहेत. अजित पवारांचा फोटो बघून नक्की त्यांच्या मनात काय चाललं आहे. हे सगळं माध्यमांकडे कसं पोहोचतं हे फारच मोठं गूढ आहे. मला असं वाटतं की, एकनाथ शिंदे अमित शाहांना भेटले, त्यावेळी सकारात्मक वातावरण होतं. चेहऱ्यावर नाराजी नाही. एकनाथ शिंदे रात्री दीड वाजता माध्यमांशी बोलले, त्यांनीही सांगितलं की, सकारात्मक चर्चा झाली."

महायुतीची बैठक रद्द

मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. ती रद्द झाली. त्याबद्दल उदय सामंत म्हणाले, "बैठक होणार आहे. नाही होणार, याबद्दल केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत. त्यामुळे बैठक होणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे. तो निर्णय लवकरात लवकर होईल." 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना