शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

गोंड समाजातील चिमुकल्यांच्या हाती ‘टॅब’

By admin | Updated: September 6, 2016 03:31 IST

१९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत.

राजकुमार जोंधळे,

लातूर- १९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत. केवळ शाळाच नव्हे, तर त्यांच्या हाती टॅबही आला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील बाभळगावच्या वैशालीनगरात राहणाऱ्या गोंड समाजातील या चिमुकल्यांच्या आयुष्याला परिवर्तनाची किनार लाभली आहे.बाभळगावच्या वैशालीनगरात ही ५० कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने कानमळ काढणे, मालिश करणे आणि गावोगावी वनऔषधी विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय. यातून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. केवळ शिक्षणाचा अभाव असल्यानेच तीन पिढ्यांच्या जीवनात दारिद्र्याची जळमटे होती. आता हा समाज शिक्षणाच्या, प्रगतीच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर मार्गक्रमण करतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गोंड समाजाची ३० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या हाती संगणकाचा माऊस आला असून, टॅबवर ही मुले आपल्या आयुष्याला आकार देऊ लागली आहेत. पाच-पन्नास रुपयांसाठी दिवसभर भटकंती करणाऱ्या समाजाला शिक्षणाचा मार्ग हाती लागला आहे. परिणामी, प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालण्याचे स्वप्न या चिमुकल्यांच्या आई-बाबांचे आहे. >दारिद्र्याशी चार पिढ्यांचा संघर्ष...दारिद्र्याशी नाते सांगणाऱ्या चौथ्या पिढ्यांनी आता शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता मार्गावरून पुन्हा मागे वळून पाहायचे नाही, असा निर्धारच येथील अजय जामकर, किशन श्यामराव जामकर, श्याम जामकर आणि विशाल जामकर यांनी केला आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हेच आम्हाला आता पटले आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.