शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशा, आंध्र प्रदेशाला चक्रीवादळाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 20:49 IST

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़. ते गुरुवारी मध्यरात्री दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीला पूरी ते कलिंगापट्टणम, गोपालगंज दरम्यान धडकणार आहे़.

ठळक मुद्देविदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यताया चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़. ते गुरुवारी मध्यरात्री दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीला पूरी ते कलिंगापट्टणम, गोपालगंज दरम्यान धडकणार आहे़. याचा परिणाम पुढील तीन दिवस ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, रायलसीमा, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानपर्यंत जाणवणार असून या परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. पुढील २४ तासात राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून ते ओडिशा व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी दरम्यान मध्यरात्री धडकणार आहे़. त्यानंतर त्याचा प्रवास जमिनीवर शुक्रवारी सकाळपासून पूर्व राजस्थानच्या दिशेने सुर राहणार आहे़. या काळात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील़ २१ सप्टेंबरला सायंकाळनंतर त्याची तीव्रता कमी होऊन २२ सप्टेंबरला ते शांत होण्याची शक्यता आहे़. या चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात गुरुवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. या चक्रीवादळाचा परिणाम २४ सप्टेंबरपर्यंत जाणविणार असून राज्यात अनेक ठिकाणी पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. इशारा : २१ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २२ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसOdishaओदिशाVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र