शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

रमेश कदमवर मेहेरनजर दाखविणा-या ठाण्यातील चार पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार

By जितेंद्र कालेकर | Published: October 19, 2019 11:30 PM

मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून परतल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्याऐवजी रमेश कदम या न्यायालयीन बंदी असलेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळयातील आरोपी आणि मोहोळ (जि. सोलापूर) येथील अपक्ष उमेदवार रमेश कदम यांच्यावर मेहेरनजर दाखवित त्यांना खासगी कारने ओवळा येथील त्यांच्या मित्राच्या घरी नेणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांकडून गंभीर दखलविभागीय चौकशीसह चौघांचे होणार निलंबनरुग्णालयातून कारागृहात नेण्याऐवजी खासगी वाहनाने गेले ओवळयातील फ्लॅटवर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारासाठी न्यायालयीन कोठडीत असलेले तसेच सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आ. रमेश कदम यांना खासगी वाहनातून घोडबंदर रोडवरील एका खासगी फ्लॅटमध्ये घेऊन जाणा-या पोलीस उपनिरीक्षक पवार याच्यासह चौघा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या चौघांचीही विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित केले जाण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने वर्तविली.साठे महामंडळातील भ्रष्टाचाराकरिता २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन बडतर्फ आ. कदम यांना अटक झाली होती. तेव्हापासून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मोहोळ मतदारसंघातून सध्या त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. १८ आॅक्टोबर रोजी वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ते ठाणे कारागृहातून बाहेर पडले होते. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर एका खासगी कारने ते ठाणे पोलीस मुख्यालयाचे उपनिरीक्षक पवार तसेच तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह ठाण्याकडे येत होते. थेट कारागृहात जाण्याऐवजी आपल्याला एक पार्सल घ्यायचे असल्याचे सांगत त्यांनी गाडी घोडबंदरला नेण्यास सांगितले. बंदोबस्तावरील पोलिसांनीही सर्वच नियम धाब्यावर बसवत त्यांना ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेन्सी इमारतीमधील तिस-या मजल्यावरील राजू खरे यांच्या ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर नेले. तेथून कदम हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी कदम आणि राजू खरे यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. पोलिसांनी कदम यांच्यावर मेहेरनजर का दाखवली? त्यांना खरोखर जे.जे. रुग्णालयात तपासणीस नेणे आवश्यक होते का? त्यांनी खासगी गाडीने नेण्यासाठी कोणाची परवानगी घेतली? गाडी कारागृहाकडे नेण्याऐवजी ओवळा येथे नियमबाह्य पद्धतीने का नेली? असे अनेक सवाल उपस्थित झाल्याने पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तांनी त्यांचा दोषारोप अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर पवार यांच्यासह चौघांचीही विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस