शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

घुमान संमेलनात खवय्यांची चंगळ !

By admin | Updated: March 24, 2015 00:31 IST

हापूस आमरस, दुधी हलवा, केशर जिलेबी, भरलं वांग, मटकीची उसळ हा कोणत्या लग्नाचा मेनू आहे असे वाटले ना! पण थांबा, हा मेनू आहे,

पुणे : हापूस आमरस, दुधी हलवा, केशर जिलेबी, भरलं वांग, मटकीची उसळ हा कोणत्या लग्नाचा मेनू आहे असे वाटले ना! पण थांबा, हा मेनू आहे, घुमानच्या साहित्य संमेलनाचा. यंदाचे संमेलन पंजाबात होत असल्यामुळे मकई की रोटी, सरसोंका सार, छाछ्, अशी काहीशी तिथली ‘स्पेशालिटी’ अनुभवायला मिळेल, असे वाटले होते. मात्र काही निवडक पंजाबी पदार्थ सोडले तर संमेलनात रसिकांना महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पण काहीही झाले तरी चंगळ होणार आहे ती मात्र खवय्यांची. कोणत्याही ठिकाणी जायचे म्हटले, की सर्वप्रथम तिथली खाण्याची खासियत काय आहे हे पाहिले जाते. संमेलनात तर हमखास मेनू काय आहे, याविषयीच्या चर्चेला उधाण येते. म्हणूनच यंदा संमेलनाच्या इतिहासात प्रथमच आयोजकांनी रसिकांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी काहीशी शक्कल लढवीत घुमानच्या संमेलनातील तीन दिवसांचा मेनू आधीच जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)रेल्वेचे वेळापत्रक जाहीर४या संमेलनासाठी मुंबई ते बियास ‘संतश्रेष्ठ नामदेव एक्स्प्रेस’ आणि नाशिक रस्ता ते उमर तांडा ‘श्री गुरुनानकदेवजी एक्स्प्रेस’ या दोन रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी या पूर्वीच ज्या प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे त्यांना २५ मार्च रोजी त्यांचे आरक्षण आॅनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.शेवटच्या दिवशी हापूस आमरस४दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणात बासुंदी, मोतीपाक, भरलं वांग, टोमॅटो कोबीची भाजी, आमटी-भात तर रात्रीच्या जेवणात दिलजानी, कांदा भजी, फ्लॉवर-बटाट्याची कोरडी भाजी, हे पदार्थ असणार आहेत. तर शेवटच्या दिवशी दुपारी हापूस आमरस, मिक्स भाजी, चवळी मसाला, कुरडई, बुंदी रायता आणि रात्री मूग हलवा, पिठले, मसाले भात, कॉर्न पॅटीस या पदार्थांची मेजवानी असणार आहे.स्मरणिकेमध्ये एकही जाहिरात नाही४मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सुरू असलेल्या पायाभूत प्रयत्नांबाबत तज्ज्ञांच्या लेखांनी समृद्ध असलेल्या ‘अभिजात’ स्मरणिकेचे प्रकाशन मंगळवारी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. या स्मरणिकेची पाने मराठी भाषेचा विकास, भाषा धोरण आणि शासन, भाषा अभिजात का आहे याचे संदर्भ, स्पष्टीकरण, विश्लेषण, वारकरी संप्रदाय आदी विविध विषयांनी नटलेली आहेत. स्मरणिकेमध्ये एकही जाहिरात नाही, हेच यंदाच्या स्मरणिकेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.