शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांविरोधात स्वाभिमानी जाणार न्यायालयात : राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:42 IST

राज्यातील १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली असून, उर्वरीत कारखान्यांकडे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत.

ठळक मुद्देएफआरपी बाबत कर्तव्यात कसूर केल्याने आंदोलनही करणारराज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही मतदारसंघात १० मे नंतर प्रचाराला जाणार राज्यातील ३० कारखान्यांनी एकूण एफआरपीच्या ६० टक्के देखील रक्कम दिलेली नाही

पुणे : उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्तीची नोटीस बजावूनही कारवाई न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी न्यायालयात जाणार आहे. तसेच,अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. राज्यातील १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली असून, उर्वरीत कारखान्यांकडे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पुण्यातील विघ्नहर कारखान्याचे सोमवारी गाळप संपले असून, यंदाचा हंगामही संपुष्टात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी शिष्टमंडळासह थकीत एफआरपी बाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सोमवारीभेट घेतली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे ऊस बिल थकविणाऱ्या राज्यातील जवळपास ६२ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली आहे. थकबाकी वसुलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीपिकेट (आरआरसी) बजावूनही जिल्हाधिकारी कारखान्यांवार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अशा जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येईल. तसेच, संघटनेच्या वतीने या जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही सुरु करण्यात येईल.  याबाबत माहिती देताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, थकबाकीदार कारखान्यांवर आरआरसी करण्याची कारवाई सुरु असून, सोमवारी दिवसभरात आणखी सहा कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. काही कारखान्यांवर तर, दोनदा आरआरआरसीची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील ३० कारखान्यांनी एकूण एफआरपीच्या ६० टक्के देखील रक्कम दिलेली नाही. -----------------------------------

साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केल्यानंतर महसुली वसुली करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. जिल्हाधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. थकबाकीदार कारखान्यांमध्ये बहुतांश कारखाने भाजपशी संबंधित नेत्यांचे आहेत. अगदी मित्र पक्षांच्या थकबाकीदार कारखान्यांवर देखील कारवाई झाली पाहीजे, अशीच आमची भूमिका आहे. त्यासाठी न्यायालय आणि आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला जाईल. खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 

-----------------------

वाराणसीत प्रचाराला जायला आवडेल : शेट्टी

बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही मतदारसंघात १० मे नंतर प्रचाराला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात देखील प्रचाराला जायला आवडेल. मात्र, अजून तेथून निमंत्रण आलेले नाही. तसेच, जेथे गरज असेल तेथे प्रचाराला जाण्याची तयारी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी