शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांवर निलंबनाची कु-हाड

By admin | Updated: March 31, 2015 04:27 IST

तहसीलदारांनी घेतलेल्या काम न करण्याच्या भूमिकेमुळे राज्यातील २,१३८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या अधिसूचना पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार सोमवारी न काढणा-या

गजानन मोहोड,  अमरावतीतहसीलदारांनी घेतलेल्या काम न करण्याच्या भूमिकेमुळे राज्यातील २,१३८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या अधिसूचना पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार सोमवारी न काढणाऱ्या ‘कामचुकार’ तहसीलदारांना तत्काळ निलंबित करून त्यांचे निवडणुकीचे काम गटविकास अधिकारी (बीडीओ) व अन्य समकक्ष अधिकाऱ्यांकडून करून घेण्याचा बडगा राज्य निवडणूक आयोगाने उगारला.ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाही याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्तांवर राहील, असेही आयोगाने बजावले. आयोगाने आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २,१३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या अधिसूचना संबंधित तहसीलदारांनी सोमवार, ३० मार्च रोजी जारी करायच्या होत्या. परंतु याआधी केलेल्या निवडणूक कामापोटी देय असलेले ३२ कोटी रुपये दिल्याखेरीज आगामी निवडणुकांचे काम न करण्याची भूमिका तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या संघटनेने घेतली. तसा इशारा त्यांनी शासनाला व निवडणूक आयोगाला यापूर्वीही दिला होता. तहसीलदार या निर्णयावर ठाम राहिल्याने निवडणूक अधिसूचना सोमवारी निघाल्या नाहीत अथवा निघू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने निवडणूक कर्तव्य पार न पाडणाऱ्या तहसीलदारांना तत्काळ निलंबित करून त्यांचे त्या कामाचे अधिकार गटविकास अधिकारी व समकक्ष अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश जारी केले. सायंकाळी सहाच्या सुमारास निघालेल्या या आदेशाची हे वृत्त लिहिपर्यंत अंमलबजावणी झालेली नव्हती. कोण्या तहसीलदारांनी कर्तव्यात कसूर केली याचा शोध घेण्याचे व पर्यायी व्यवस्था करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सोमवारी अधिसूचना निघाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापासून ते मतदान आणि निकालापर्यंतचे निवडणुकीचे पुढील सात टप्पे पार पडायचे आहेत. तहसीलदारांनी घेतलेल्या या ताठर भूमिकेमुळे आयोगाला ठरल्याप्रमाणे निवडणूक पार पाडता येते की पुन्हा एकदा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करावा लागतो, हे पाहायचे.आयोगाला असतात सर्वाधिकारराज्यघटनेच्या अनुच्छेद २४३-के अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेळेवर घेणे, त्या सुरळितपणे पार पाडणे व त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहेत. निवडणूक कर्मचारी हे मुळचे सरकारी सेवेतील असले तरी निवडणुकीपुरत्या त्यांच्या सेवा आयोगाच्या अखत्यारित असतात. त्यामुळे निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयोग थेट कारवाई करू शकतो व यासंबंधात दिलेले आदेश राज्य सरकारवर बंधनकारक असतात.> आयोगाच्या कामात बाधा आणणे, कर्तव्यात कसूर करणे व सोपविलेली जबाबदारी पार न पाडणे हे घटनाबाह्य कृत्य असून, ज्या तहसीलदारांनी अशी कर्तव्यच्युती केली असेल त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.-जे. एस. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त