शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांचे निलंबन टळले

By admin | Updated: April 1, 2015 02:05 IST

निवडणूक कामापोटी देय असलेली ३८ कोटींची थकबाकी एप्रिलअखेर अदा करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाने दिल्यामुळे एकीकडे ३६० तहसीलदारांच्या

गजानन मोहोड, अमरावतीनिवडणूक कामापोटी देय असलेली ३८ कोटींची थकबाकी एप्रिलअखेर अदा करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाने दिल्यामुळे एकीकडे ३६० तहसीलदारांच्या डोक्यावरची संभाव्य निलंबनाची टांगती तलवार दूर झाली. तर दुसरीकडे राज्यातील २ हजार १३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठरल्या कार्यक्रमानुसार पार पडण्याचा मार्गही मोकळा झाला. सोमवारी अधिसूचना न काढणाऱ्या तहसीलदारांना निलंबित करून गटविकास अधिकाऱ्यांकडून निवडणुकांचे काम करून घेण्याचा बडगा निवडणूक आयोगाने उगारला होता. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी निवडणूक आयोग आणि ग्रामविकास मंत्रालयाशी चर्चा केली. सर्व तालुक्यांना देय असलेली निवडणुकीची थकबाकी ३० एप्रिलपर्यंत वितरित केली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयातून त्यांना देण्यात आले. त्यामुळे तिढा सुटून दोन हजार १३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना रात्री १२ पूर्वीच आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी काढली.