शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कामटेंच्या वायरलेस संभाषणाच्या चौकशीस स्थगिती

By admin | Updated: June 21, 2015 01:30 IST

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या त्या दिवशी पोलीस नियंत्रण कक्षाशी वायरलेसवरून

मुंबई : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या त्या दिवशी पोलीस नियंत्रण कक्षाशी वायरलेसवरून झालेल्या संभाषणाच्या नोंदींमध्ये आढळून आलेल्या कथित तफावतींची राज्य सरकारने चौकशी आयोग नेमून चौकशी करावी, या राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.२६/११च्या हल्ल्यात एकाच व्हॅनमध्ये बसलेले ‘एटीएस’चे तत्कालिन प्रमुख हेमंत करकरे, ‘चकमक फेम’ पोलीस निरीक्षक विजय साळसकर व अशोक कामटे शहीद झाले होते. त्या व्हॅनमधील बिनतारी संदेश यंत्र व पोलीस नियंत्रण कक्ष यांच्या दरम्यान त्यावेळी झालेल्या संभाषणाच्या नोंदी (लॉग) कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी माहिती अधिकार कायद्याखाली मागितल्या होत्या. सुरुवातीस नकार दिल्यानंतर नोव्हेंबर २००९ व फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांना त्या नोंदी देण्यात आल्या. परंतु त्यात कथित तफावती आढळल्याने श्रीमती कामटे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अर्ज केला होता.त्यावर, राज्य सरकारने विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून या प्रकरणी चौकशी करावी, असा आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी गेल्या वर्षी ९ जुलै रोजी दिला होता. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेली रिट याचिका दाखल करून घेताना न्या. अनूप मोहता व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली.माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी पाहता या मुद्द्यावर सविस्तर विचार होणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्थगिती देताना नमूद केले. आता श्रीमती कामटे व माहिती आयुक्तांना नोटीस काढण्यात आली असून अंतिम सुनावणी ३० जुलैला व्हायची आहे. (विशेष प्रतिनिधी)