शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Result: 'मविआ'ला मोठा धक्का? दहाव्या जागेसाठी सस्पेन्स, ३ उमेदवारांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 22:16 IST

या निवडणुकीत भाजपाचे चार उमेदवार जिंकले असून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार जिंकले.

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २ मते बाद झाल्यानंतर २८३ मते वैध ठरवण्यात आली. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपाचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले. त्यानंतर या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते मिळाली तर भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची २० मते मिळाली. 

या निवडणुकीत भाजपा ४ उमेदवार पहिल्या पसंतीच्या फेरीत जिंकले तर काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम आहे. दहाव्या जागेसाठी धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीत पहिल्या पसंतीत एकनाथ खडसे - २९, सचिन आहिर - २६. आमश्या पाडवी - २६, श्रीकांत भारतीय - ३०, प्रविण दरेकर - २९, राम शिंदे - ३०, उमा खापरे - २७, प्रसाद लाड - १७ रामराजे नाईक निंबाळकर - २८ मते पडली. 

काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीला विलंबविधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला. त्यासाठी काँग्रेसनं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब झाला. 

निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळलाभाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे असा दावा भाजपा नेते करत होते. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुकृतदर्शनी आक्षेप योग्य नसल्याने मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असेल असं भाजपाचे आमदार राहूल नार्वेकर यांनी सांगितलं. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपा