भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:04 IST2022-11-07T18:00:46+5:302022-11-07T18:04:22+5:30

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Sushma Andhare criticizes Eknath Shinde group over Supriya Sule's statement by Minister Abdul Sattar | भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्देवी आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिंदे गटातील नेते सातत्याने महिला राजकारण्यांवर ठरवून टीका करत आहेत. अब्दुल सत्तार यांच्यावर आता कारवाई जाली पाहिजे. त्यांनी मंत्रिदाचा राजिनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 

भाजप पक्ष महिलांना दुय्यम वागणूक देते, भाजपचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण हीम दर्जाचा आहे. मिंधे लोक सध्या भाजपच्या आश्रयाला गेले आहेत.  त्यामुळे त्यांनाही भाजपचा गुण लागला आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर केली आहे.  

अब्दुल सत्तार यांनी टीका काय केली?

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेले वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना फोनवरुन खडे बोल सुनावले आहेत. सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे. 

यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व प्रवक्त्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रवक्त्यांना माध्यमांशी कोण बोलणार यावर चर्चा करण्यात येणार आहे.  

Web Title: Sushma Andhare criticizes Eknath Shinde group over Supriya Sule's statement by Minister Abdul Sattar