शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

पाच जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: July 27, 2016 01:29 IST

गडचिरोली जिल्ह्यातील पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या समक्ष त्यांनी आत्मसमर्पण केले. त्या सर्वांवर मिळून पोलिसांनी एकूण १४ लाखांची बक्षिसे जाहीर केली होती.आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार लाखाचे बक्षीस असलेला प्लाटून क्रमांक ३ सदस्य कालिदास उर्फ रामलाल सरदार हुपुंडी व प्लाटून क्रमांक १५चा सदस्य जागेश उर्फ दुल्लुराम जिटीराम हिडको तसेच प्रत्येकी दोन लाखांचे बक्षीस असलेले गट्टा एरिया सीएनएम टीमचे सदस्य जीवन उर्फ छबीलाल बिपतराम मडावी, सप्लाय टीम सदस्या अंकिता उर्फ जानकी वत्ते पदा व मिलिशीया सदस्य सुखराम लालुराम वड्डे यांचा समावेश आहे. यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला प्रचंड हादरा बसला असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. कालिदास उर्फ रामलाल हुपुंडी हा वडगाव येथील राहणारा असून, तो प्लाटून क्रमांक ३चा सदस्य होता. त्याला तत्कालीन डीव्हीसी दिवाकर याने पोलिसांची भीती दाखवून बळजबरीने दलममध्ये भरती केले होते. सन २००८ ते मार्च २०१३पर्यंत तो नक्षल संघटनेमध्ये कार्यरत होता. या कार्यकाळात त्याने १४ घटनांमध्ये सहभाग घेतला. जीवन उर्फ छबीलाल बिपतराम मडावी हा धानोरा तालुक्याच्या फुलकोडो गावचा रहिवासी असून, वयाच्या १५व्या वर्षी तो नक्षल दलममध्ये सहभागी झाला. त्याने या काळात दोन गुन्हे केले. जागेश उर्फ दुल्लूराम हिडको हा मोरचूल येथील रहिवासी असून, तोही वयाच्या १५व्या वर्षी नक्षल दलममध्ये भरती झाला. आॅगस्ट २०१५ ते जून २०१६ या काळात त्याने प्लाटून दलम १५चा सदस्य म्हणून काम केले. त्याचा सहा घटनांमध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. अंकिता उर्फ जानकी वत्ते ही झारेवाडा (ता. एटापल्ली) येथील रहिवासी असून, ती नक्षलवाद्यांच्या शस्त्राच्या आकर्षणामुळे दलममध्ये स्वच्छेने भरती झाली. जुलै २०१० ते मार्च २०१२ या काळात ती दलममध्ये कार्यरत होती. तिने गट्टा दलम कंपनी क्रमांक १०मध्ये काम केले. तिचा सहा घटनांमध्ये सहभाग होता. सुखराम लालूराम वड्डे हा केहकावाही (ता. धानोरा) येथील रहिवासी असून, त्याचा दोन घटनांमध्ये सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)३१ नक्षलवाद्यांचे२०१६मध्ये आत्मसमर्पण- २०१६ या वर्षात आतापर्यंत एक नक्षल विभागीय समितीचा सदस्य, एक कमांडर व विविध दलमच्या २९ नक्षल सदस्यांसह तब्बल ३१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.