"खोक्या, सॉरी बाबा मला गडबडीत..."; सुरेश धसांची सतीश भोसलेसोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:45 IST2025-03-06T17:42:55+5:302025-03-06T17:45:00+5:30

Satish bhosale Suresh Dhas: एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला. जो व्यक्ती मारहाण करत आहे, तो सुरेश धस यांच्या जवळचा असून, सतीश भोसले असे त्याचे नाव आहे. 

Suresh Dhas and satish bhosale conection audio call clip goes viral | "खोक्या, सॉरी बाबा मला गडबडीत..."; सुरेश धसांची सतीश भोसलेसोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

"खोक्या, सॉरी बाबा मला गडबडीत..."; सुरेश धसांची सतीश भोसलेसोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

Suresh Dhas Satish Bhosale: एक अर्धनग्न अवस्थेतील व्यक्तीला एकाने व्यक्तीने पकडलं आहे आणि दुसरा व्यक्ती बॅटने त्याला मारतोय... बॅटने मारणारा हा व्यक्ती आहे, एका खोक्या भाई उर्फ पार्टी उर्फ सतीश भोसले! संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना घेरणाऱ्या आमदार सुरेश धस यांचा सतीश भोसले जवळचा कार्यकर्ता आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सतीश भोसलेसोबत बोलतानाची सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना शिरूर तालुक्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजपचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले हा बॅटने मारतोय. या घटनेनंतर एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे, ज्यात आमदार सुरेश धस या भोसलेचा उल्लेख खोक्या असा करत आहेत. 

'खोक्या सॉरी बाबा'; ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?
  
सुरेश धस- हा खोक्या

सतीश भोसले - हा... बोला ना

सुरेश धस - हॅलो, सॉरी अरे बाबा मला गडबडीत जमलं नाही, शुभेच्छा द्यायला. 

सतीश भोसले - बोला ना, बोला ना.

सुरेश धस - काही नाही. वाढदिवसाच्या बीलेटेट शुभेच्छा.

सतीश भोसले - धन्यवाद. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त असाच. 

सुरेश धस - शंभर टक्के आहे. काय? 99 टक्के सुद्धा नाही. शंभर आहे...

सतीश भोसले - (हसत) ओके बॉस. ओके बॉस. धन्यवाद बॉस. 

असे संभाषण सुरेश धस आणि सतीश भोसले याच्या झालेले आहे. या संभाषणाच्या सुरुवातीलाच सुरेश धस या सतीश भोसलेचा उल्लेख खोक्या असा करतात. हा व्हिडीओ सतीश भोसले या नावाने असलेल्या सोशल मीडिया अकाऊंटरवर शेअर करण्यात आलेला आहे. 

सतीश भोसले याचे इतरही अनेक व्हिडीओ सतीश भोसलेबद्दलचे समोर येत आहे. यापैकीच एका व्हिडीओमध्ये सतीश भोसले कारमध्ये चालकाच्या बाजूच्या आसनावर बसलेला आहे आणि नोटांचे बंडल दाखवत आहे. त्याचबरोबर आणखी एक व्हिडीओ आहे, त्यातही सतीश भोसले हा नोटांची बंडल दाखवत आहे. 

अंजली दमानिया यांनीही सतीश भोसलेबद्दलचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुरेश धस यांच्यावरही टीका केली आहे. 

Web Title: Suresh Dhas and satish bhosale conection audio call clip goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.