दाभोलकर आणि फडणवीसांची तुलना करणारे सुप्रिया सुळेंचे विधान दिशाभूल करणारे, हे विधान मागे घ्यावे’, काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:48 IST2026-03-26T18:48:09+5:302026-03-26T18:48:52+5:30

Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे, चिड व संताप आणणारे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Supriya Sule's statement comparing Dabholkar and Fadnavis is misleading, this statement should be withdrawn, Congress demands | दाभोलकर आणि फडणवीसांची तुलना करणारे सुप्रिया सुळेंचे विधान दिशाभूल करणारे, हे विधान मागे घ्यावे’, काँग्रेसची मागणी 

दाभोलकर आणि फडणवीसांची तुलना करणारे सुप्रिया सुळेंचे विधान दिशाभूल करणारे, हे विधान मागे घ्यावे’, काँग्रेसची मागणी 

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे, चिड व संताप आणणारे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व देवेंद्र फडवणीसांची तुलना होऊच शकत नाही, दोघांच्या विचाराचा वारसा व मार्ग भिन्न आहेत, असे स्पष्ट करून खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंद्धश्रद्धेचे निर्मुलन व्हावे, समाज जाणता व्हावा यासाठी आयुष्य खर्ची घातले व ते कार्य करत असतानाच ते शहीद झाले. दाभोलकरांचा वारसा हा शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचा, अंधश्रद्धा निर्मुलनाचा, सत्य व अहिंसेचा आहे, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारा आहे. दाभोलकरांचे योगदान मोठे आहे, तर देवेंद्र फडणवीसांचा मार्ग हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा आहे, पुरोगामी विचाराला बाजूला ठेवून प्रतिगामी विचाराला चालना देणारा आहे, अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारा आहे, दोघांचा मार्ग एक असूच शकत नाही. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला, तुकारामांच्या गाथा बुडवल्या, त्यांचे वैचारिक वारसादार फडणवीस आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारा वारसा फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा वारसा त्यांचा आहे. संविधान गुंडाळून बंच ऑफ थॉट चा संघाचा वारसा पुढे घेऊन जाणारा विचार फडणवीस यांचा आहे, असेही सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मला भावासारखे आहेत, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील होते तर मी त्या समितीचा सदस्य होतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर मी दुःख व खंत व्यक्त करतो. सुप्रिया सुळे यांना त्यांचे वडील शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराचा तसेच ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे, याची जाणीव आणि भान त्यांनी ठेवावे. सुप्रिया सुळे चोर आणि संन्यासी दोघांना एकत्र दाखवत आहेत, त्यांचे वक्तव्य चिड व संताप आणणारे आहे, त्यावर त्यांनी खुलासा करून विधान मागे असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. 

 

Web Title : सुप्रिया सुले दाभोलकर-फडणवीस तुलना वापस लें: कांग्रेस की मांग

Web Summary : कांग्रेस ने सुप्रिया सुले द्वारा फडणवीस की तुलना दाभोलकर से करने की आलोचना की। उन्होंने विचारधाराओं के अंतर का हवाला देते हुए इसे वापस लेने की मांग की। हर्षवर्धन सपकाल ने कहा कि दाभोलकर ने तर्कवाद का समर्थन किया, जबकि फडणवीस प्रतिगामी विचारों को बढ़ावा देते हैं।

Web Title : Congress Demands Supriya Sule Retract Dabholkar-Fadnavis Comparison; Statement Misleading

Web Summary : Congress criticizes Supriya Sule's comparison of Fadnavis to Dabholkar as misleading. They demand retraction, citing differing ideologies. Dabholkar championed rationalism, while Fadnavis promotes regressive ideas, aligning with those who opposed progressive figures and constitutional values, says Harshvardhan Sapkal.