शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

Video : गोडबोल्यापेक्षा कडक बोलणारा माझा दादाच चांगला - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 21:05 IST

खरं बोलल्यामुळे दादा कधी कधी अडचणीत ही येतो, पण खोटं बोलत नाही. गोड बोलणार्‍यापेक्षा थोडा कडक बोलणारा माझा दादाच चांगला

अमळनेर : गोड बोलून मोठी स्वप्न दाखवणाऱ्यांकडून आता सावध रहा. एक वेळ कडू बोलणारा चालेल पण गोड बोलणारा नको. जसा आमचा दादा कडक बोलतो पण खरं बोलतो. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल कर आता दादाच हवा, असे प्रतिपादन करून सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या वृत्तीवर टीका करत अजितदादांचे कौतुक केले. 

मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीजी दोन मिनिटे महाराष्ट्राबद्दल बोलले आणि उरलेले २२ मिनिटे देशातील इतर गोष्टींवर बोलत मोठ मोठी स्वप्ने दाखवत बसले. बेरोजगार, कर्जमाफी, हमीभाव याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. आता आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असं इशारा देत त्या पुढे म्हणाला, गोड बोलणार्‍यापेक्षा थोडा कडक बोलणारा, शिस्तप्रिय असा माझा दादाच चांगला आहे. खरं बोलल्यामुळे दादा कधी कधी अडचणीत ही येतो, पण खोटं बोलत नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

सुप्रिया ताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाइची तिलाही झळ -

खरे वाटणार नाही ना? पण हे खरे आहे. हा किस्सा स्वतः सांगीतला आहे हे सुप्रिया सुळे यांनी. अमळनेर येथील सभेत त्या म्हणाल्या, माझी आई सामान्य गृहिणी असून ती आज देखील पिशवी घेऊन बाजारात भाजी विकत घ्यायला जाते. स्वतः गॅस बुक करते. आज भाजीपाल्यापासून गॅस पर्यंत महागाई वाढलेली आहे. तेव्हा आई मला म्हणते, 'तुमच्या काळात एवढी महागाई नव्हती, आज खुपच महागाई असून पैशांची बचतच होत नाही', अशी माहिती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली. 

उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आज अमळनेर येथे तेराव्या सभेसाठी त्या उपस्थित असताना बोलत होत्या. "काहींचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की शरद पवार यांची बायको बाजारात स्वतः भाजी आणायला जाते. आघाडी सरकारची सत्ता होती तेव्हा टिव्हीवर भाजपची जाहीरात लागायची, 'बोहोत हुई मंहगाई की मार... " तेव्हा आई म्हणायची तुमच्या राज्यात किती महागाई झाली". मी आणि साहेब गपचीप ते ऐकून घ्यायचो, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली. 

त्या पुढे म्हणाल्या, "सध्या तथाकथित अच्छे दिनचे राज्य आले आहे, तेव्हा मी तिला विचारते की आज काय परिस्थिती आहे. तर ती म्हणते, जुनी परिस्थितीच चांगली होती. तुमच्या राज्यात बचत व्हायची ती देखील आज होत नाही". हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित महिलांमध्ये एकच हशा पिकला, जणू प्रत्येक घरातील परिस्थिती सुप्रियाताई कथन करत होत्या.

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारAmalnerअमळनेर