शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 14:17 IST

NCP SP MP Supriya Sule News: आपल्यावर संस्कार झालेले आहेत, बैलपोळा साजरा करतो, आम्ही शेतकरी आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णयावर दिली.

NCP SP MP Supriya Sule News: आपण नेहमी गोमाताच म्हणतो गाईला माता म्हणणारी आपली संस्कृती आहे अन्नपूर्णेची ही आपण पूजा करतो अन्नाची पूजा होते त्यामुळे मला नवीन वाटत नाही जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत बैलपोळा करतोच, आम्ही सगळे शेतकरी आहोत, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.

भावी मुख्यमंत्री या यादीत आता रोहित पवार यांचेही नाव जोडले गेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्रीपद देण्याचा शब्द आजोबा शरद पवार यांनी एका सभेत बोलताना दिला. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे बॅनर झळकले. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी स्पष्ट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 

रोहित पवार मुख्यमंत्री झाले, शरद पवारांचा वारसा चालवला तर हरकत काय?

माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकते. रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचे कारणच काय? असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, मुंबई, नवी मुंबईत बैठका घेणार आहेत. यावर बोलताना, अतिथी देवो भव. पाहुण्यांचे स्वागत झाले पाहिजे, आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत, संविधान केंद्र ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या, अशी त्यांची विचारसरणी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार. एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत, एक वर्षांपूर्वींना पक्ष कुठे होता, चिन्ह कुठे होते, आमदार-खासदार जे जी सत्तेची पद होती, त्यातील पक्ष चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं., मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. कारण मायबाप जनतेच्या लक्षात आले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्तीला असे वाटते की, अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. या राज्याने दाखवून दिले की, अदृश्य शक्ती ते चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवार