शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:51 IST

राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्रास डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश केले जात असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेवर आक्षेप : एनआरआय कोटयातील प्रवेशांमध्ये घोळ

पुणे : राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत व खाजगी विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राखीव एन.आरआय कोटीतील प्रवेशप्रक्रिया राबविताना मोठयाप्रमाणात गैरप्रकार घडत आहे. सर्रास डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश केले जात असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयांमधील एनआरआय कोटयातील प्रवेश कशी राबवायची याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्याचे वैद्यकीय महाविद्यालयांकडून सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळ खाजगी महाविद्यालय, अभिमत विद्यापीठ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात सर्वोच्च न्यायालयात मनविसेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालक तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व अभिमत विद्यापीठांमध्ये एनआरआय कोटयातील प्रवेश प्रक्रिया राबविताना विद्यार्थी-पालक एनआरआय असेल तर त्या विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य द्यावे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचे नातेवाईक एनआरआय असतील आणि ते विद्यार्थ्याची संपूर्ण फी ही त्यांच्या एनआरआय बँक खात्यातून देणार असतील तरच त्या विद्यार्थ्यांना एनआरआय कोटयातून प्रवेश द्यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण संचलनालयाकडून त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले होते. मात्र तरीही अनेक खाजगी महाविद्यालयांनी एनआरआय कोटयाची प्रवेश प्रक्रिया यानुसार पार पाडली नाही. अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लाखो रूपयांचे डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातून प्रवेश देण्यात आले आहेत. जनहित याचिके व्दारे ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आली आहे.    वैद्यकीय शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना गुणवत्तेनुसारच प्रवेशप्रक्रिया राबवावी तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८  मध्ये एनआरआय कोटयातंर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्याची संपूर्ण तपशिलांसह  माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, तरीही अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी याचे पालन केलेले नाही. उलट पुन्हा डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. विशेष म्हणजे समुपदेशन करतेवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाºयांसमक्षच असे प्रवेश झाले आहेत. याबाबत सर्व माहिती पुराव्यानिशी जनहित याचिके व्दारे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे ,असे कल्पेश यादव यांनी सांगितले. 

................विद्यार्थ्यांना दिलासा मिळावावैद्यकिय महाविद्यालयांकडून एनआरआय कोटयातील प्रवेश प्रक्रिया योग्यप्रकारे राबविली जात नसल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडेवेळोवेळी दाद मागूनही उपयोग झाला नाही. महाविद्यालयांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना निश्चित दिलासा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी