शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अजित पवारांसह बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 13:31 IST

आरोपींनी तातडीने सुनावणीसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली. 

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते - पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ६ विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुणकुमार मिश्रा व न्या . एम. आर. शहा यांनी सोमवारी फेटाळल्या आहेत. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून दिलेला कारवाईचा आदेश योग्यच असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच, याप्रकरणी आरोपींनी तातडीने सुनावणीसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली. 

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला (ईवोडब्ल्यू) दिले होते. त्यानुसार २५ हजार  कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते - पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या ७६ जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली. सक्तवसुली संचालनालयही (ईडी) या प्रकरणाची समांतर चौकशी करेल, अशीही माहिती मिळते.

(महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल)

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbankबँकMaharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट